सरकारने साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

पटणा : राज्य सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये उसाच्या समर्थन मूल्यात वाढ केलेली नाही. ऊसासाठीचा उत्पादन खर्च वाढला असतानाही सरकारकडून मूल्य वाढवले जात नाही. राज्यातील साखर कारखाने बंद पडले. सरकारने त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत असा आरोप काँग्रेसने केला आहे.

बिहार काँग्रेसचे प्रभारी आणि पूर्व केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांनी १४ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा करत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. बिहारमध्ये एनडीएच्या सरकारने धान्य आणि गव्हाची खरेदी कमी केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना आपल्या उत्पादनाच्या योग्य किमतीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे पक्षाच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

दास यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून बिहारमध्ये ऊसाच्या एमएसपीमध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही. राज्यातील साखर कारखाने बंद पाडण्यात आले. सरकारने त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. यावेळी बिहार काँग्रेसचे प्रमुख मदन मोहन झा, काँग्रेसचे आमदारांचे गटनेते अजित शर्मा, बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल शर्मा, विधान परिषदेचे आमदार प्रेम चंद्र मिश्रा, पक्षाचे वरिष्ठ नेते हरखू झा, एच. के. वर्मा, राजेश राठोर आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here