मुंबईत रेस्टॉरंट निर्देशांनुसार सुरू करण्याची परवानगी द्या : एफएचआरएआयची मागणी

84

मुंबई : राज्य सरकारने शहरांमध्ये रेस्टॉरंट खास निर्देशांनुसार चालविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स ऑफ इंडियाने (एफएचआरएआय) केली आहे.

एफएचआरएआयचे उपाध्यक्ष गुरबक्शीश सिंह कोहली यांनी सांगिते की, महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी दुसऱ्या लाटेच्या कार्यकाळात चांगले प्रयत्न केले. सरकार आणि मुंबई नगरपालिकेने या संकटापासून बचाव करण्यासाठी साधवगिरीची उपाययोजना केल्याचे आम्हाला माहीत आहे. अधिकाऱ्यांवर यातून दबाव वाढला आहे. किरकोळ बाबींची पूर्तता करण्यासाठी त्यांना टीकेला सामोरे जावे लागते.

याचबरोबर सावधगिरीच्या काही जादा उपायांमुळ मुंबईच्या रेस्टॉरंट उद्योगाला खूप नुकसानीला सामोरे जावे लागले आहे असे कोहली यांनी सांगितले. ते म्हणाले, टप्पा दोनमध्ये येणाऱ्या शहरांमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील रेस्टॉरंट आणि बार आठवडाभर दररोज रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले आहेत. मात्र, याला मुंबईचा अपवाद आहे. मुंबईत आता कोरोनाचा एक स्तर कमी आला आहे. त्यामुळे रेस्टॉरंटना परवानगी देणे गरजेचे आहे. तसे न केल्यास ते अनुचित ठरेल. आजारापेक्षा उपचार भयंकर अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here