भारताकडून टेरिफ-रेट कोट्याअंतर्गत मक्का आयातीला परवानगी

नवी दिल्ली:भारताने टेरिफ-रेट कोटा(TRQ) अंतर्गत मका, कच्चे सूर्यफूल तेल आणि दूध पावडरच्या मर्यादित आयातीला परवानगी दिली आहे.भारत हा पाम, सोया आणि सूर्यफूल यासारख्या वनस्पती तेलांचा जगातील सर्वात मोठा आयातदार आणि दुधाचा सर्वोच्च उत्पादक आहे. भारताने १,५०,००० मेट्रिक टन सूर्यफूल तेल किंवा करडई तेल, ४,९८,९०० टन मका, १०,००० टन दूध पावडर आणि १,५०,००० टन शुद्ध रेपसीड तेल आयात करण्यास परवानगी दिली आहे, असे सरकारने सांगितले.

पिकांवर प्रतिकूल हवामानाच्या परिणामांमुळे पुरवठ्याच्या घटकांमुळे वाढणारी अन्नधान्य चलनवाढ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वार्षिक आधारावर सुमारे ८ टक्के आहे.त्यामुळे व्याजदर कपातीत अडचणी येत आहेत. सरकारने आयातीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळासारख्या(NDDB), नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन(NCDF) आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) सरकारी कंपन्यांना निवडले आहे.

एका जागतिक व्यापार गृहाच्या मुंबईतील डीलरने सांगितले की, सवलतीच्या दरात सूर्यफूल आणि रेपसीड तेलाच्या आयातीला परवानगी देण्याची गरज नाही.स्वस्त आयातीमुळे आधीच दबाव आहे.आता शुल्कमुक्त आयातीमुळे आणखी स्थिती बिकट होईल.भारत आपल्या वनस्पती तेलाच्या गरजांपैकी दोन तृतीयांश गरजा प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियामधून सोयाबीन तेलाची आयात करतो.तसेच रशिया, युक्रेन, अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सूर्यफूल तेलाच्या आयातीद्वारे गरज भागवतो.

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, परंतु अलीकडेच, मोठ्या दुग्धशाळांनी मर्यादित पुरवठ्यामध्ये मागणी वाढल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत.पोल्ट्री आणि इथेनॉल उद्योगांच्या जोरदार मागणीमुळे देशांतर्गत मक्याचे भाव वाढत होते.भारतात कोणत्याही अनुवांशिकरित्या सुधारित अन्न पिकांच्या लागवडीस परवानगी दिली जात नाही, त्यानुसार आयातीत अनुवांशिकरित्या सुधारित जीवांचे कोणतेही ट्रेस नसतील याची, खात्री करण्यासाठी नियम लागू केले आहेत.

याबाबत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे  म्हणाले कि, मका आयात ही केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे,  त्याचा दीर्घकालीन फायदा होण्याची शक्यता कमी आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी  देशांतर्गत मका पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि अनुदान देण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तर देशांतर्गत मुबलक प्रमाणात मका पिकाचे उत्पादन होऊ शकते. त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थीक स्थैर्य तर येईलच पण त्याशिवाय इथेनॉल उत्पादनासाठी देशांतर्गत बाजारपेठेत गरजेइतका मका उपलब्ध होऊ शकतो.  त्याचा फायदा पोल्ट्री उद्योगालाही होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here