देशात 11 ऑगस्टपर्यंत जवळपास 90 टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण…


नवी दिल्ली : 11 ऑगस्ट 2023 पर्यंत  देशात खरीप पिकांची पेरणी सुमारे 90 टक्के पूर्ण झाली आहे. भाताचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे 4.92 टक्के वाढले आहे. आंध्र प्रदेश, आसाम आणि ओडिशामध्ये आतापर्यंत भात पेरणी कमी झाली आहे. सहसा, खरीप पिकांची पेरणी ऑगस्टच्या मध्यापासून सुरू होते, परंतु यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, देशाच्या अनेक भागांमध्ये नैऋत्य मान्सूनला उशीर झाल्याने पेरणीचा कालावधी वाढू शकतो. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक म्हणून तांदळाला ओळखले जाते. निर्यातीवरील निर्बंधांमुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाताची 11 ऑगस्टपर्यंत सुमारे 32.82 दशलक्ष हेक्टरवर म्हणजेच साधारण 82.25 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here