मुंबई : अल्फालॉजिक टेक्सिस लिमिटेडने इथेनॉल प्लांटसाठी (तडाली) चंद्रपूर विकास केंद्रात ६९,३६८ स्क्वेअर मिटर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. अल्फालॉजिक टेक्सिसने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चंद्रपूर (तडाली) ग्रोथ सेंटरसोबत भाडे करार पूर्ण केला आहे.
कंपनीने भारतीय शेअर बाजारात नियामक मंडळाकडे केलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे की, लिज अॅग्रीमेंटनुसार, चंद्रपूरच्या जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. दरम्यान हे वृत्त समजताच शेअर बाजारात दुपारी १२.२६ वाजता अल्फालॉजिक टेक्सिसचा शेअर बीएसइवर ६.६५ टक्के वधारुन ३६.९० रुपयांवर ट्रेड करीत होता.