अंबाला, हरियाणा: प्रशासन पाला जाळण्याबाबत कडक झाले आहे. कृषी विकास अधिकारी इंद्रजीत सिंह यांच्या तक्रारीवरुन सरकारचा प्रतिबंध असूनही पीकाचा पाला जाळण्याबाबत पोलिसांनी अंबाला जिल्ह्याच्या गोला आणि टोबा गावातील आठ शेतकर्यांवर तक्रार दाखल केली. अंबाला चे कृषी उपसंचालक गिरीश नागपाल यांनी सांगितले की, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल च्या आदेशांनुसार, हरियाणा सरकारने पर्यावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी तांदळाचा पाला जाळण्यावर पूर्ण प्रतिबंध लागू केला आहे.
त्यांनी सांगितले की, अंबालाचे डिप्टी कमिश्नर यांच्या आदेशांनुसार, पंचायतींविरोधात विशेष कारवाइं केली जाईल. ज्यांच्या परिसरात याप्रकारचा पाला जाळण्याची प्रकिया केली जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.