एम्बीशनविन बेव्हरेजेस सरोजनी नगरमध्ये उभारणार इथेनॉल प्लांट

लखनौ : गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन घेतले जात आहे.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, एम्बीशनविन ब्रेव्हरेजेसनेही सरोजनीनगरमध्ये इथेनॉल प्लांट उभारणीची योजना तयार केली आहे. या प्लांटमध्ये ऊस, धान्याचा भुस्सा, उसाचा रस, साखरेचा पाक, ज्वारी, मक्का तसेच इतर धान्यापासून इथेनॉलचे उत्पादन केले जाईल. या प्लांटमध्ये दररोज ७५० किलो लिटर इथेनॉल उत्पादन होऊ शकेल. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी श्रीवास्तव यांनी सांगितले की, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात कोनशीला समारंभानंतर मार्चमध्ये या प्रोजेक्टचे काम सुरू केले जाईल. कंपनी लवकरच पूर्वांचलमध्येही अशाच प्रकारचा प्लांट उभारणी करण्याची योजना तयार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here