कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या वाणाचे संशोधन सुरू

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पाचट जाळण्याचे प्रकार थांबविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) सांगितले की, कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या तांदळाच्या वाणांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. पंजाब आणि इतर भागातील शेतकऱ्यांकडून पाचट जाळल्याने उत्तर भारतात हिवाळ्यादरम्यान वायू प्रदूषणात वाढ होत आहे.

पीटीआयशी बोलताना आयएआरआयचे संचालक ए. के. सिंह यांनी सांगितले की, पंजाबमध्ये दीर्घ कालावधीत भात पिकामुळे पिक अवशेष व्यवस्थापनाला कमी वेळ मिळतो. त्यामुळे पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. ते म्हणाले, कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या वाणांमुळे शेतकऱ्यांनाच पाचट व्यवस्थापनासाठी २५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी मिळेल, आणि सिंचनासाठीचे पाणी आणि खर्चातही बचत होईल. कमी कालावधीतील भात पिके सप्टेंबरच्या मध्यात अथवा ऑक्टोबरच्या अखेरीस कापणीसाठी तयारी होतील. त्यातून गव्हाच्या पेरणीसाठी शेती तयार करण्यास एक महिन्यापेक्षा अधिक वेळ मिळेल. सध्या दीर्घ कालावधीचे भात पीक असल्याने शेतकऱ्यांकडून त्याची तोडणी ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here