अमेरिका : इथेनॉल उत्पादन एक वर्षाच्या निच्चांकी स्तरावर

83

वॉशिंगटन : अमेरिकेतील इथेनॉल उत्पादन आणि साठा गेल्या आठवड्यात अनेक महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. सध्या इथेनॉल उत्पादन सरासरी ९,०१,००० बॅरल प्रती दिन आहे. यामध्ये आठवड्याच्या स्तरावर ६२,००० बॅरल प्रतीदिन आणि वार्षिक २५,००० बॅरल प्रती दिन घसरण झाली आहे. फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदाच ही सर्वात कमी साप्ताहीक सरासरी आहे असे यूएस एनर्जी इन्फर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे.

देशांतर्गत पुरवठ्यात सातत्याने चौथ्या आठवड्यात घसरण झाली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या मक्का पिकाच्या उपलब्धतेत कमी आल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीनंतर सर्वात निच्चांकी स्तर २२.५०१ मिलियन बॅरलवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा साठा ३,४२,००० ने कमी आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत २.३९ मिलियनची वाढ झाली आहे. दरम्यान, रिन्यूएबल फ्युएल असोसिएशनने म्हटले आहे की, इथेनॉल रिफायनरी आणि ब्लोअरचे शुद्ध उत्पादन २४ आठवड्यांच्या निच्चांकी स्तरावर गेले आहे. बाजारात पुरवठा केल्या जाणाऱ्या पेट्रोलचे प्रमाण २ टक्क्यांनी घटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here