टांझानियातील साखर कारखान्यात स्फोट, ११ जणांचा मृत्यू, भारतीय नागरिकाचाही समावेश

दोडोमा : तुरियानी मोरोगोरो येथील साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात ११ जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारखान्यात झालेल्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केनिया आणि भारतातील नागरिकांचाही समावेश आहे. ‘द सिटीझन’शी बोलताना मटिबवा साखर कारखान्याच्या हीटिंग सिस्टिममधील स्फोटानंतर हा स्फोट झाला.

याबाबत मोरोगोरो रिजनल फायर अँड रेस्क्यू कमांडर शाबान मारुगुझो यांनी सांगितले की, मध्यरात्री एकच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटात साखर उत्पादनाच्या तयारीत असलेल्या ११ जणांचा मृत्यू झाला आणि इतर दोन जण जखमी झाले, असे मारुगुजो यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आणि आम्ही तपास सुरू केला आहे. या अपघाताचा अहवाल मिळाल्यानंतर आम्ही अपघातस्थळी एक टीम तैनात केली आहे. या टीमकडून तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही अधिकृत अहवाल जाहीर करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here