आणि आली कोरोना वैक्सीन, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटेनमध्ये सुरु होईल लसीकरण

114

यूनाइटेड किंगडम ने फाइजर-बायोएनटेक ची कोरोना वैक्सीन ला मंजूरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयापूर्वी फाइजर-बायोएनटेक ची कोरोना वैक्सीन ला मंजुरी देणारा यूनाइटेड किंगडम पहिला पश्‍चिमी देश बनला आहे. हे वैक्सीन पुढच्या आठवड्यापासून ब्रिटेनमध्ये उपलब्ध होईल.

काही दिवसांपूर्वी फाइजर कंपनीने घोंषणा केली होती की, ते लॅब मध्ये कोविड 19 म्हणजेच कोरोनाची अशी वैक्सीन बनवण्यात यश आले, जे की वायरस च्या समोर 96 टक्के परीणामकारक आहे. उद्याच जर्मनीची बायोफार्मास्यूटिकल कंपनी बायोएनटेक आणि त्याची भागीदार अमेरिकी फाइजर ने यूरोपिया संघासमोर वैक्सीन रजिस्ट्रेशन साठी औपचारिक आवेदन दिले होते.

ब्रिटेन च्या मेडिसीन अ‍ॅन्ड हेल्थकेअर प्रॉडक्टस रेग्युलेटरी एजंन्सी कडून फाइजर आणि बायोएनटेक कोरोना वैक्सीन चे आकलन करण्यास मंजुरी दिली आहे. ही एजन्सी हेदेखील निर्धारीत करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे की, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि एस्ट्राजेनेका च्या वैक्सीन कठोर सुरक्षा मनकांना पूर्ण करते की नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here