आंध्र प्रदेश : मुख्यमंत्र्यांकडून YSR free crop insurance scheme अंतर्गत २,९७७ कोटी रुपयांचे वितरण

श्री सत्यसाई जिल्हा : YSR free crop insurance scheme च्या अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी राज्यातील १५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी २,९७७.८० कोटी रुपयांचे वितरण केले आहे. या शेतकऱ्यांच्या पिकांचे खरीप हंगाम २०२१ मध्ये नुकसान झाले होते. श्री सत्यसाई जिल्ह्यातील चेन्नेकोथापल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान विमा राशीचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान पिक विमा योजना आणि राज्य सरकारच्या मोफत पिक विमा योजनेंतर्गत ही नुकसान भरपाई दिली जात आहे. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी सांगितले की, जर एखाद्या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असेल, तर आम्ही त्यांना पुढील हंगामापूर्वी अशा शेतकऱ्यांच्या हाती नुकसान भरपाई देत आहोत. आम्ही कोणतीही लाच अथवा भेदभाव केल्याशिवाय नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या हाती देत आहोत.

तेलुगु देशम पार्टीवर टीका करताना जगन म्हणाले की, गेल्या सरकारने पाच वर्षात ३०.८५ लाख शेतकऱ्यांना फक्त ३,४११ कोटी रुपयांचे वितरण केले होते. मात्र, आमच्या सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षात आम्ही आधीच वायएसआर मोफत पिक विमा योजनेअंतर्गत ४४.२८ लाख शेतकऱ्यांना ६.६८४ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. गेल्या सरकारच्या थकबाकीचे वितरण करताना आम्ही वळेवर शेतकऱ्यांच्या हाती मदत पोहोचेल असे निश्चित केले आहे.

अविभाज्य अनंतपूर जिल्ह्यात २०१९ आणि २०२० खरीप हंगामात ६२८ कोटी रुपयांची विमा रक्कम वितरीत करण्यात आली. या वर्षात येथे सरकारने अविभाज्य अनंतपूर जिल्ह्यात ३.३५ लाख शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या रुपात ४६७.८१ कोटी रुपयांचे वितरण करण्याची घोषणा केली होती, तेथे फेरआढाव्यानंतर सरकारने अनंतपूरमध्ये नुकसान भरपाईच्या रुपात ४.०४.४६१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८८५.४५ कोटी रुपये जमा केले आहेत. श्री सत्यसाईं जिल्ह्यात १,७१,८८१ शेतकऱ्यांना २५५.७८ कोटी रुपये, अनंतपूरमध्ये २,३२,५८० शेतकऱ्यांना ६२९.७७ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी सांगितले की, राज्य सरकार गेल्या सरकाप्रमाणे शेतकऱ्यांम मदत करण्याचे थांबविणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तेदेपा घोषणापत्रातील त्रुटी आणि आपल्या कार्यकाळातील आश्वासनांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण करण्याबाबत आम्ही आधीच्या मुख्यमंत्र्यांशी स्पर्धा करीत नाही. आम्ही देशासोबत स्पर्धा करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here