आंध्र प्रदेश: भीमासिंगी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीला गती

177

विजयनगरम : बंद पडलेला भीमासिंगी साखर कारखाना सुरू करण्याबाबत सर्वपक्षीय एकमत होताना दिसत आहे. सर्व पक्षांच्या नेत्यंनी आंध्र प्रदेश सरकारकडे हा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी केली आहे. जामी विभागातील भीमसिंगी जंक्शनवर आयोजित सभेत माजी आमदार के ललिता कुमारी यांनी शेतकऱ्यांच्या कारखाना सुरू करण्याच्या मागणीचा सरकारने विचार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी जिल्ह्यातील आमदार, विधानसभा सदस्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन केले आहे.

सीपीएमचे नेते तम्मिनेनी सूर्यनारायण यांनी सांगितले की, हजारो शेतकरी कारखाना सुरू होण्याची प्रतिक्षा करीत आहेत. शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारशी लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. लोकसत्ताचे कार्यकारी अध्यक्ष भीसेटी बबजी यांनी जिल्हाधिकारी तसेच कारखाना प्रशासन यांना या मुद्यावर चर्चेसाठी शेतकरी आणि नेत्यांसोबत सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणी केली. ते म्हणाले, या क्षेत्रात जवळपास ४०,००० टन ऊसाचे उत्पादन केले जात आहे. जर कारखाना सुरळीत चालला तर शेतकऱ्यांचा फायदा होईल.

सीपीआयचे नेते पी. कामेश्वर राव म्हणाले, मंत्री बोत्चा सत्यनारायण सह जिल्ह्यातील नेत्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सभेत नेते बी. बालाजी, बी. के. भास्कर नायडू आणि इतर नेत्यांनी सहभाग घेतला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here