आंध्र प्रदेश : भिमासिंगी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी

विजयनगरम : राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी भिमासिंगी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी लोक सत्ता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भीसेटी बाबजी यांनी केली. लोकसत्ता पक्षाने विजयनगरम -कोठवलासा रस्त्यावरील भिमासिंगी कारखान्यात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.

याबाबत द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, यावेळी बोलताना लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकरी कारखाना बंद झाल्याने चिंतेत आहेत. कारखाना बंद पडल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतातील ऊस पिकाचे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कारखाना तत्काळ सुरू केल्यास जे यावर अवलंबून आहेत अशा शेतकरी, कारखान्याचे कामगार आणि इतरांना मदत मिळेल.

बाबजी यांनी सांगितले की, कारखान्याचे आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य अधांतरी असल्याने त्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. टीडीपीचे नेते बी. एस. एस. व्ही. नरसिंह राव यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत नसल्याचा आरोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here