आंध्र प्रदेश: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हवीय सरकारची मदत

कडप्पा : ऊस उत्पादन आणि विक्रीत येत असलेल्या अडथळांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. चेन्नूर सहकारी साखर कारखाना बंद झाल्यानंतर जिल्ह्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्र खूप कमी झाले आहे. ऊसाची विक्रीही खालावली आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांनी ऊस शेती सुरू ठेवली आहे.

सद्यस्थितीतकाही शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला ऊस विक्रीसाठी अन्य ठिकाणी जात आहेत. मात्र, या शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. जवळपास २६२ शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून पैसे मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्य्ताली पोदालकुरू येथील साखर कारखान्याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३ कोटी रुपये थकीत आहेत. गेल्यावर्षी १८ ऑक्टोबर रोजी नव्या सचिवालय भवनाच्या उद्घाटनासाठी चपडू येथे आलेले खासदार अविनाश रेड्डी आणि माईडूकुरू येथील आमदार रघूराम रेड्डी यांच्याकडे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. खासदार रेड्डी यांनी तातडीने सहाय्यक ऊस आयुक्तांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वीही शेतकऱ्यांनी राज्य कृषी विभागाचे मुख्य सल्लागार अंबाती कृष्णारेड्डी यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

चपडू मंडलमधील राजूगारीपेटा गावातून साधारमतः ३१ हजार ५०० टन ऊस कारखान्याला पाठविले गेला होता. सुरुवातीला साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सुमारे ३० लाख रुपयांचे वितरण केले. मात्र, उर्वरीत पैसे गेल्या दोन वर्षांपासून थकीत आहेत. तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेती करणे सोडून दिले आहे. चपडू मंडलमध्ये यापूर्वी हजारो एकरामध्ये ऊस शेती केली जात होती. मात्र, आता उसाची लागवड अतिशय खालावली आहे.
चेंन्नूर साखर कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी दिले होते. हा कारखाना सुरू करण्यासाठी सरकारकडून एका समितीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यानंतरही फारसे काही झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here