आंध्र प्रदेश : गुलाब चक्रीवादळाने पिकांचे सुमारे १०० कोटींचे नुकसान

विजयवाडा : अलीकडेच आलेल्या गुलाब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशमध्ये सुमारे १.०२ लाख एकरातील पिकांचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार, कापूस, हरभरा, भात, भुईमुग, मक्का, ऊस, तंबाखू, नाचणा आदी पिकांचे श्रीकाकुलम, विजयनग, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि कृष्णा या सहा जिल्ह्यांत सुमारे १.८२ लाख एकर क्षेत्र पुराच्या विळख्यात सापडले. यापैकी श्रीकाकुलम, विजयनगर, विशाखापट्टणम, कृष्णा आणि कडपा जिल्ह्यातील ६६२९.८१ एकर क्षेत्रात केळी, नारळ, मिरची, काजू, हळद आणि भाजीपाल्याच्या पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला नसल्याने आणि हवामान बदलल्याने तापमान वाढीसह शेतातील पाणी कमी होऊ लागले आहे. यादरम्यान, शेती आणि बागायती अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. राज्य सरकारला पिकांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १.०२ लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे मूल्य ७० कोटी ते १०० कोटी रुपयांपर्यंत राहील.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे ८५३७ एकरातील अनेक पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले आहे. त्याचा फटका ७६९२ शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांनी ६९१.३५ लाख रुपयांच्या अनुदानाचा अंदाज वर्तविला आहे. अतिरिक्त संचालक बालाजी नाईक यांनी सांगितले की, आमचे अधिकारी नुकसान झालेल्या शेताची पाहणी, पंचनामा करीत आहेत. पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी दिली जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here