आंध्र प्रदेश: अनाकापल्ले बाजारातील गूळ विक्रीत मोठी घसरण

विशाखापट्टणम : देशातील सर्वात मोठ्या गूळ बाजारपेठेपैकी एक असलेल्या अनाकापल्ले बाजारपेठेला केवळ विक्रीतील घसरणीलाच नव्हे तर इतर राज्यांशी स्पर्धेलाही तोंड द्यावे लागत आहे. एक काळ असा होता की या बाजारपेठेतून २०० कोटी रुपयांची उलाढाल व्हायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इतर राज्यातील उत्पादकांकडून कमी दरातील गुळाची विक्री सुरू झाल्याने अनाकापल्ले गूळ बाजारातील विक्रीत मोठी घसरण झाली आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील गूळ उत्पादक आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात आपला व्यवसाय वाढवत आहेत.

अनाकापल्ले मधील गूळ विक्रीत घसरणीला अनेक कारणे आहेत. एकतर येथील गूळ उत्पादक सद्यस्थितीत बाजाराचा कल ओळखण्यात अपयशी ठरले आहेत. ते केवळ ढेपेचे उत्पादन करतात. दुसरीकडे उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील गूळ उत्पादक आपला माल कमी दरात विकण्यास सक्षम आहेत. याशिवाय, अनाकापल्ले गुळाची गुणवत्ता चांगली असूनही इतर राज्ये विविध भागातील कमी गुंतवणूकीच्या उत्पादनांची निवड करतात. त्यामध्ये पावडर गुळाचाही समावेश आहे. दरवर्षी अनाकापल्लेचा गूळ हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि डिसेंबर ते एप्रिलमध्ये तो बहरतो. येथे येणाऱ्या ढेपीचे वजन सरासरी १५ किलो असते. एक दशकापूर्वी येथून ४० लाख ढेपींचे उत्पादन केले जात होते. तेव्हा याची विक्री पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, आसाम, महाराष्ट्र आणि तामिळनाडूत केली जात होती.

अनाकापल्ले मर्चंट असोसिएशनचे मानद सचिव लक्ष्मी नारायण (पेडा बाबू) म्हणाले, गेल्यावर्षी केवळ २५ लाख गूळ ढेपा मिळाल्या. यात काही बदल होईल अशी आम्हाला अपेक्षा नाही. कारण यापूर्वी एक लाख ढेपा कमी झाल्या आहेत. गुळाच्या छोट्या साच्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे असोसिएशनने तशा साच्यांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, साचे नसल्याने विक्रीत सुधारणा झालेली नाही. याशिवाय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून गूळ पावडर येत असल्याने अशा यूनीटची कमतरता चिंतेचे कारण आहे. तांत्रिक दृष्ट्या गूळ उत्पादकांनी स्वतःला अपग्रेड करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here