कृष्णा : जिल्ह्यातील बापुलपाडू विभागातील मल्लावल्ली गावात नितीन साई कन्स्ट्रक्शनने १५० केएलपीडी क्षमतेचा धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. हे प्रस्तावित युनिट २०.३८ एकर जमिनीवर स्थापन केले जाईल. आणि यामध्ये पाच मेगावॅट क्षमतेच्या सह वीज निर्मिती प्रकल्पाचाही समावेश असेल.
याबाबत, प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंपनीने Q३/FY २४ मध्ये योजनेचे काम सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सद्यस्थितीत नितीन साई कन्स्ट्रक्शनला या योजनेसाठी पर्यावरणीय मंजुरीची (ईसी) प्रतीक्षा आहे. त्याशिवाय, ठेकेदार आणि मशीनरी पुरवठादारांच्या निवडीला अंतिम रुप देणे बाकी आहे.