विजयनगरम, आंध्र प्रदेश : जिल्ह्यातील कोंडावलसामध्ये Roasche Green Agro ने १०० केएलपीडी क्षमतेने इथेनॉल उत्पादन करण्यासाठी एक धान्यावर आधारित डिस्टलरी प्लांट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. ही योजना ११.७० एकर जमिनीवर (४.७३ हेक्टरमध्ये) स्थापन होईल. आणि यामध्ये २.५ मेगावॅट विज उत्पादन युनिटचाही समावेश आहे.
याबाबत, प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यासंदर्भात मिळालेल्या नविन अपडेट्सनुसार, Roasche Green Agro ला या योजनेसाठी पर्यावरण मंजुरीची (ईसी) प्रतीक्षा आहे. योजनेवर सप्टेंबर २०२३ पर्यंत काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनी डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करेल अशी शक्यता आहे.