आंध्र प्रदेश: भीमासिंगी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न

101

विजयनगर, आंध्र प्रदेश : जिल्ह्यातील जामी विभागातील भीमासिंगी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी राज्य सरकारवर आपला दबाव वाढवला आहे. त्यासाठी जनजागृतीसाठी मेळावे, बैठकांचे आयोजन केले जात आहे. शेतकऱ्यांसमवेत बैठकांचे आयोजन करून त्यांच्याकडून पाठिंबा मिळवला जात आहे. लोकसत्ता पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष भीसेटी बाबजी, भाकपच्या राज्य समितीचे सदस्य एम. कामेश्वर राव आणि जेडपीटीसीचे माजी सदस्य पेदाबाबू यांनी विजयनगरचे आमदार विरभद्र स्वामी आणि गजपतीनगरच के. बी. अप्पला नरसय्या यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यवस्थापन आणि तांत्रिक कारणांनी साखर कारखाना बंद असून तो पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सांगितले की, सरकारने यावर्षी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांकडून ४०,००० टन उसाचे उत्पादन करण्यात आले आहे. मात्र, कारखाना कधी सुरू होणार याचा अद्याप पत्ता नाही. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी कारखाना आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. जर कारखाना सुरू झाला तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. आसपासच्या दहा विभागांना आर्थिक फायदा होईल. मुख्यमंत्री आपले आश्वासन पाळतात काय हे पाहण्याची वेळ आली आहे असे बाबाजी आणि कामेश्वर राव यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here