आंध्र प्रदेश: थकीत ऊस बिले देण्याची टीडीपीची मुख्यमंत्री रेड्डींकडे मागणी

अमरावती : विजयनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दीर्घ काळापासून थकीत असलेल्या १७ कोटी रुपयांची ऊस बिले त्वरीत द्यावीत अशी मागणी टीडीपीचे राष्ट्रीय महासचिव एन. लोकेश यांनी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी नोंदवलेले खोटे गुन्हेही मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. एनसीएस साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे गेल्या दोन हंगामातील जवळपास २,००० शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत. थकबाकीच्या मागणीसाठी लोकेश हे साखर कारखान्याविरोधात आंदोलन करीत आहेत.

Thehansindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, राज्य सरकार शेतकऱ्यांची उपेक्षा करीत आहेत. रयतू भरोसा केंद्रांत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. विजयनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना कथीत नोटीस दिल्याचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here