ऊस बिले न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

गोंडा : कुंदरखीच्या बजाज शुगर मिलने वेळेवर ऊस बिले न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काँग्रेसचे नेते त्रिलोकी नाथ तिवारी यांच्या उपस्थितीत बजाज कारखान्याच्या वजन काट्यासमोर आंदोलन केले. यावेळी लखनौ ऊस आयुक्तांना देण्यासाठी करनैलगंज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, बजाज साखर कारखाना कुंदरखीने २० डिसेंबर २०२० पर्यंतची ऊस बिले दिली आहेत. त्यानंतर पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना नेहमीची शेतीकामे करतानाही अडचणी येत आहेत. निवेदन देणाऱ्यांमध्ये करनैलगंज विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसह काँग्रेस नेते त्रिलोकी नाथ तिवारी, लल्लन शुक्ला, केशवानंद, मुरलीधर मिश्रा, पवन कुमार, संजय कुमार, राजेंद्र कुमार, जिलेदार सिंह, लवकुश सिंह, शिवलाल ओझा, बाबादीन तिवारी, सीताराम, राधेश्याम, प्रमोद कुमार, हरी राम, राम नरेश आदी उपस्थित होते. हे निवेदन लखनौ ऊस आयुक्तांना देण्यासाठी तहसीलदारांकडे देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here