अनिल कवडे यांची राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र सरकारने 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यभरातील अनेक वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला. त्यामध्ये 2003 बॅचचे आयएएस अधिकारी आणि सध्याचे सहकार आयुक्त, पुण्यातील सहकारी संस्थांचे निबंधक अनिल एम. कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सौरभ राव यांच्या जागी पुण्याचे नवे विभागीय आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सौरभ राव यांना सहकार आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अनिल कवडे यांचा महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्यातील साखर उद्योगाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here