अनिल कवडे यांच्याकडे साखर आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार

पुणे: साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. Agrowon मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार राज्य सरकार ने सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे साखर आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

श्री. अनिल कवडे सध्या राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था या पदावर सक्षमपणे काम पाहत आहेत. राज्यातील सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे. कवडे यांच्या नियुक्तीने राज्यातील राजकीय आणि सहकार वर्तुळात नवीन साखर आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार या चर्चेला तूर्तास पूर्णविराम लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here