इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता हर्षवर्धन पाटील

पुणे : नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या संस्थेच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. देशातील साखर उद्योगामध्ये अग्रेसरपणे काम करणारी इस्मा ही महत्वाची संस्था आहे.

अंकिता पाटील ह्या ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनच्या देशातील सर्वात तरुण व एकमेव महिला सदस्या आहेत. अंकिता पाटील या उच्च शिक्षित असून परदेशामध्ये शिक्षण झालेले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तसेच एस.बी. पाटील ग्रुपच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहात आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) चे देशातील सहाशे पन्नास हून अधिक सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील साखर कारखानदार सदस्य आहेत. या संस्थेची स्थापना सन 1932 मध्ये करण्यात आली.

भारत जगामध्ये साखर उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशातील सहकारी साखर कारखाने आणिऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्मा ही संस्था प्रभावीपणे काम करीत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here