कोल्हापूर : कागल तालुक्यातील अन्नपूर्णा शुगरने केमिकल फ्री गूळ पावडर व सल्फर लेस खांडसरी साखर उत्पादनात अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. यंदा जॅगरी (गुळ) पावडरला बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. चालू गळीत हंगामात अडीच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन संजय घाटगे यांनी केले.
केनवडे (ता. कागल) येथील श्री. अन्नपूर्णा शुगर ॲण्ड जॅगरी वर्क्सच्या चौथ्या बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ‘गोकुळ’चे संचालक अंबरिपसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते. बॉयलरचे अग्निप्रदीपन संचालक शिवसिंह घाटगे, सिमंतिनी घाटगे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास अरूंधती घाटगे, संचालक धनाजी गोधडे, दत्तोपंत वालावलकर, ए. वाय. पाटील, विश्वास दिंडोर्ले, उत्तम पाटील, रणजित मुडूकशिवाले, नानासो कांबळे, शुभांगी पाटील, आकाराम बचाटे, तानाजी कांबळे, धोंडिराम एकशिंगे यांच्यासह ऊस तोडणी ठेकेदार, वाहतूकदार व शेतकरी उपस्थित होते. स्वागत धनराज घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष पाटील यांनी केले.