हंगाम सुरु करण्यापूर्वी ऊसाचा दर घोषित करा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

185

नेवासे: कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. अशावेळी त्यांना फक्त त्यांच्या ऊसाचाच आधार आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी ऊसाला दर घोषित करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली आहे.

शेतकर्‍यांची आर्थिक अडचण लक्षात घेवून 2020-21 चा ऊसाचा दर हंगाम सुरु करण्यापूर्वी जाहिर करावा.साडेतीन व 50 किलोमीटर पुढील ऊसतोड व वाहतूक दर सांगावेत. हे दोन्ही दर शासनमान्य असावेत. तसेच वजनकाटे तपासून घेवून, साखर व अन्य उत्पादने याचा विचार करुन 80:20 या प्रमाणात ऊसाला दर द्यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, बाळासाहेब फटांगडे, प्रशांत भराट, प्रवीण म्हस्के, अशोक भोसले, अमोर देवढे, रावसाहेब लवांडे, दादा पाचरणे, नारायण पायघण आदींच्या सह्या आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here