उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरातमध्ये पोटनिवडणुकांसाठी तारखांची घोषणा

निवडणुक आयोगाने उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात आदी राज्यामंध्ये पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. या राज्यांमध्ये 3 नोव्हेंबरला मतदान होईल आणि निकाल 10 नोव्हेंबर ला जाहीर केले जातील. आयोगाने मंगळवारी सांगितले की, मध्य प्रदेशासह विविध राज्यांच्या 54 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबर ला मतदान होईल. तर बिहारमध्ये वाल्मीकी नगर लोकसभा जागेसाठीं 7 नोव्हेंबर ला मतदान होईल.

निवडणुक आयोगाने सांगितले की, बिहारच्या एका लोकसभा जागे शिवाय मणिपुर मध्ये दोन विधानसभा जागांसाठी ही मतदान 7 नोव्हेंबरला होईल. छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालँड, ओडिसा, तेलंगणा आणि यूपीमध्ये 3नोव्हेंबरला मतदान होईल आणि 10 नोव्हेंंबरला निकाल जाहीर होतील. निवडणुक आयोगाने आसाम, केरळ, तामिळनाडू अणि पश्‍चिम बंगाल मध्ये पोटनिवडणुकांसाठी तारखा घोषित केल्या नाहीत.

अलीकडेच, केंद्रीय निवडणुक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुका घोषित केल्या आहेत. बिहार मध्ये 243 सीट साठी तीन टप्प्यात मतदान होईल. 28 ऑक्टोबर, 3 व 7 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. कोरोना काळामध्ये पहिल्यांदा होणार्‍या निवडणुकांसाठी मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगितले होते की, महामारी ला पाहता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी मतदानाची वेळ एक तास वाढवली आहे. मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल. कोरोनाग्रस्त आणि संभावित लोक शेवटच्या वेळी मतदान करतील. मतदान केंद्रांवर मास्क, हॅन्ड सॅनिटायजर आणि ग्लोव्हज ची व्यवस्था केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here