‘व्हीएसआय’च्या पुरस्कारांची घोषणा : कागलचा छत्रपती शाहू कारखाना सर्वोत्कृष्ट

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. यासह अन्य पुरस्कार जाहीर झाले असून, ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. गाळप हंगाम २०२२-२३ मधील कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबत ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष व सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ‘व्हीएसआय’ची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. २.५१ लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार कोपरगाव तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार कन्हाडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार दौंड शुगर्स प्रा. लि. कारखान्याला जाहीर झाला आहे. कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार माळशिरसच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखान्याला जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार :

■ दक्षिण विभाग – डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना, कडेगाव.

■ मध्य विभाग – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. आंबेगाव

■ उत्तरपूर्व विभाग- रेणा सहकारी साखर कारखाना, लि. लातूर

उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार

■  दक्षिण विभाग – क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल.

■ मध्य विभाग – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर.

■ उत्तरपूर्व विभाग – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि. युनिट १, जालना.

 तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार :

■ दक्षिण विभाग –

  • प्रथम पुरस्कार- क्रांती अग्रणीडॉ. जी. डी. बापू लाड सहकारीसाखर कारखाना, कुंडल.
  • द्वितीय पुरस्कार- जयवंत शुगर्सलिमिटेड,कराड.
  • तृतीय पुरस्कार – विश्वासरावनाईक सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शिराळा.

■ मध्य विभाग –

  • प्रथम – आष्टी शुगर्स लि. मोहोळ,सोलापूर
  • द्वितीय – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. आंबेगाव
  • तृतीय- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.सोलापूर

 ■उत्तरपूर्व विभाग –

  • प्रथम(विभागून)– रेणा सहकारी साखर कारखाना, रेणापूर, लातूर आणि विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट १, निवळी, लातूर.
  • द्वितीय – विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना.लातूर.
  • तृतीय(विभागून)- पूर्णा सहकारी साखर कारखाना, वसमतनगर, हिंगोली. आणि नॅचरल शुगर्स अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज. लि. धाराशिव.

 राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार :

■ कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार – विमल लक्ष्मण चौगुले, मजरेवाडी, ता. शिरोळ. जि. कोल्हापूर.

■कै. वसंतराव नाईक पुरस्कार – पोपट तुकाराम महाबरे, कुसुर, ता. जुन्नर, जि. पुणे.

■कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार अनिकेत हनुमंत बावकर. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here