रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स व्हेंचर्स लिमिटेडने लोटस चॉकलेट कंपनीची ५१ टक्के भागीदारी विकत घेतली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या सहयोगी कंपनीने गुरुवारी याची माहिती दिली. एफएमसीजी फर्म रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने अर्ध्याहून अधिक भागीदारीसाठी या व्यवहारासाठी एकूण ७४ करोड रुपये खर्च केले आहेत. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या या सहायक कंपनीने लोटस चॉकलेट कंपनीचे सध्याचे प्रवर्तक आणि प्रवर्तक गटातील प्रकाश पी. पै, अनंत पी. पै आणि इतर सदस्यांकडून ही कंपनी ७४ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. रिलायन्स रिटेलने आपल्या नियामकांकडील फायलिंगमध्ये सांगितले आहे की, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड लोटसचे ६५,४८,९३५ इक्विटी शेअर्स विकत घेईल, जे लोटसच्या सध्याच्या प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाच्या च्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलच्या ५१ टक्क्यांचे प्रतिनिधित्व करेल. रिलायन्सच्या या कंपनीने ११३ रुपये प्रती शेअर या दराने हिस्सा खरेदी केला आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने लोटसच्या सार्वजनिक शेअरधारकांसाठी २६ टक्के खुल्या ऑफर ची घोषणा केली आहे. कंपनीने नियामक फायलिंगमध्ये सांगितले आहे की, आरसीपीएल लोटसचे ३३,३८,६७३ भागभांडवल विकत घेण्यासाठी लोटसच्या सार्वजनिक भागधारकांसाठी एक जाहीर घोषणा करेल, जे लोटसच्या भाग भांडवलाच्या २६ टक्के असेल. लोटससोबत काम करण्यास आम्ही उत्साही आहे असे इशा अंबानी यांनी सांगितले.