टांझानिया मध्ये साखरेच्या किमती नियंत्रीत

टांझानिया: टांझानिया सरकार ने प्रतिकूल वातावरणामुळे साखरेच्या उत्पादनात झालेली मोठी घट पाहून देशामध्ये साखरेचे रिटेल दर नियंत्रीत केले आहेत. टांझानियाचे कृषी मंत्री जफेट हसुंगा यांनी सांगितले की, पूर्व अफ्रीकी देशाचे साखर उत्पादन या वर्षी 300,000 मेट्रिक टन पेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे, तर देशामध्ये साखरेची वार्षिक मागणी

470,000 टन इतकी आहे. हसुंगा म्हणाले, सरकारने अशा स्थिती मध्ये आपले पूर्ण बळ वापरून साखरेच्या किंमती नियंत्रीत केल्या आहेत.

सरकार ने डार एस सलाम च्या कमर्शियल हब मध्ये प्रति किलोग्राम 2,600 शिलिंग साखरेची रिटेल किंमत निर्धारीत केली आहे. देशाच्या अन्य भागामध्ये 2,600 शिलिंग ते 3,000 शिलिंग प्रति किलोग्राम दरम्यान ठेवण्याची सरकारने परवानगी दिली आहे. तंजानिया चे राष्ट्रपति जॉन मैगुफुली यांनी गेल्या वर्षी साखरेच्या किंमती निर्धारित केल्या होत्या, पण ते त्या लागू करण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here