एपीएमसी मार्केट 11 मे पासून बंद होणार

मुंबई : कोरोना वायरसची वाढती संख्या पाहता, नवी मुंबईच्या वाशी क्षेत्रामध्ये असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) 11 पासून 17 मे पर्यंत बंद राहील. मजूर आणि व्यापारी यांना भिती वाटत होती की, सध्याच्या स्थितीमुळे ते कोरोना वायरस मुळे संक्रमित होवू शकतात.

या दरम्यान एपीएमसी प्रशासन आणि एनएमएमसी बाजार परिसराला सॅनिटाइज केले जाईल. सर्व बाजाराच्या हितधारकांबरोबर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, खाद्य, भाजी, फळे, कांदा, बटाटा आणि मसाला बाजार पूर्णत: बंद होतील. या शनिवार-रविवारी बाजार खुला राहील.

गुरुवारी नवी मुंबई चे मेयर जयवंत सुतार यांनी महाराष्ट्र सरकारला वाशीमध्ये एपीएमसी बाजार बंद करण्याचा आग्रह केला होता. यापूर्वी एपीएमसी मध्ये कोरोना रुग्ण सापडले होते, ज्यानंतर येथील सावधानता अधिक वाढली आहे कारण इथे अधिक गर्दी असते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here