शेतकर्‍यांना ऊस माफियांपासून वाचवण्यासाठी अ‍ॅप

लखनऊ: शेतकर्‍यांना ऊस माफियांपासून सुटका मिळण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच ऊस शेतकर्‍यांसाठी ई-ऊस अ‍ॅप लॉन्च करणार आहेत. ऊस शेतकर्‍यांच्या उपस्थितीत ऊसाच्या शेतीच्या मापाचे डिजिटलकरण करुन ऊस माफियांना पायबंद घालण्याच्या दिशेने योगी सरकारने हे पाउल उचलले आहे. हे अ‍ॅप ऊसाची किंमत शेतकर्‍यांसमोरच मापेल आणि निश्‍चित केलेल्या कालावधीच्या आत ऊसाचे पैसे मिळवण्यावर जोर देईल.

या अ‍ॅपमुळे शेतकर्‍यांना त्यांच्या ऊसाच्या दराबरोबरच साखर कारखान्यांद्वारानी त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेल्या पैशांसंदर्भातही शेतकर्‍यांना जाणून घेता येईल. तसेच ते दुसर्‍या शेतकर्‍यांच्या बाबतीत देखील समान तथ्यांची तपासणी करु शकतील.

साखर आणि ऊस विकासचे प्रमुख सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, ऊस माफिया आणि प्रभावशाली राजकीय नेत्यांमध्ये खूपच मजबूत गाठ असते. हे नेते केवळ छोटे आणि सीमांत श्रेणीतील ऊस शेतकर्‍यांचे शोषण करत नाहीत, तर त्यांना धोकाही देतात. हे सगळे कारखान्यातील अधिकार्‍यांसोबत ऊसाच्या उत्पादनातही हेराफेरी करतात. भूसरेड्डी म्हणाले, त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रस्ताव दिला आहे. ते अगदी लवकरच या अ‍ॅपचे अनावरण करतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here