महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातील कारखान्यांनाही ऑक्सिजन उत्पादनाचे आवाहन

183

बेळगाव : राज्यातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्राप्रमाणे कारखान्यांप्रमाणे मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करावे असे आवाहन कर्नाटकचे उप मुख्यमंत्री गोविंद करजोल यांनी सांगितले. तेथील काही कारखान्यांमध्ये ऑक्सिजन उत्पादन युनीट आहे, त्यांच्याकडे २० टन ऑक्सिजन उत्पादन करत आहेत. आम्हालाही अशा प्रकारच्या मॉडेलची गरज आहे. या संकटात कारखाने सहकार्य करतील असे करजोल यांनी सांगितले.

राज्य सरकारने सांगितले आहे की ओएनजीसी आणि एमआरपीएल बेळगाव, हावेरी, गदग, उत्तर कन्नड आणि बेल्लारी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यात येतील. त्यांनी सरकारी गेस्ट हाउसमधअये अधिकारी आणि आमदारांच्या एका बैठकीत सांगितले की, आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की ओएनजीसीचा बागलकोट येथे अशा पद्धतीचा प्लांट सुरू करेल.

बेळगाव जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याबाबत जागा निवडावी आणि त्याचा एक अहवाल पाठवावा असे निर्देश उप मुख्यमंत्र्यांनी उपायुक्त के. हरीश कुमार यांना दिले.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्याच्यावतीने ऑक्सिजन निर्मितीच्या प्रस्तावाव काम सुरू आहे. त्यातून देशातील ऑक्सिजनची समस्या संपुष्टात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here