लखीमपूर हिंसाचार विरोधात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

लखीमपूर खिरी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. राज्यातील सत्तारुढ महाविकास आघाडीच्या सरकारने हे आवाहन करतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूबाबतचा ठराव मंजूर केला. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव सादर केला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी याला पाठिंबा दिला.

राष्ट्रवादीचे नेते, मंत्री जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने लखीमपूर खिरीच्या हिंसक घटनेविरोधात ११ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यामध्ये तसाच जोश आणि उत्साह दिसतो, जसा त्यांच्या दिवंगत आजी इंदिरा गांधी यांच्यामध्ये आहे. लखिमपूरमध्ये पीडित कुटुंबाला भेटायला जाणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका यांच्यावर अटकेची कारवाई करणाऱ्या भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना शिवसेनेने ही टिप्पणी केली आहे. सामना या मुखपत्राच्या संपादकीयमधून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांना अडविल्याबद्दलही जोरदार टीका केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर घटनेची मोठी किंमत भाजपला चुकवावी लागेल. पूर्ण विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत असे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार संवेदनशील नाही. जी स्थिती इंग्रजांनी जालियनवाला बाग प्रकरणात केली, तशीच स्थिती उत्तर प्रदेशात निर्माण करण्यात आली आहे, अशी टीका त्यांनी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here