मुजफ्फरपूरमध्ये मेगा फूड पार्कसह १०८८ कोटींच्या १८ गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता

मुजफ्फरपूर, बिहार: जिल्ह्यात लेदर आणि मेगा फूड पार्कसाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय इतर उद्योग सुरू करण्याचे प्रस्तावही मिळाले आहेत. नवे उद्योग आणण्यासाठी जमिनीचे करार केले जात आहेत. केंद्र सरकारने मोतीपूरमध्ये मेगा फूड पार्क तयार करण्याची घोषणा केल्यानंतर औद्योगिक परिसराचा विस्तार केले जात आहे. उद्योग मंत्री सैयद शहनवाज हुसेन यांनी उद्योगांना पाठबळ दिले आहे. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी बेला औद्योगिक क्षेत्रात जमिनीचा दर कमी ठेवला आहे. बेला औद्योगिक क्षेत्राचा दर ३.६१ कोटी रुपये, तर मोतीपूर औद्योगिक क्षेत्राचा दर ४४ लाख रुपये प्रती एकर आहे. जिल्ह्यात १८ मोठ्या उद्योगांसाठी १०८८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

मोतीपूर साखर कारखान्याने विविध सात ठिकाणी जमीन दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नातून ४०० कोटी रुपये खर्चून ८९ एकर जमिनीवर बिहारमधील पहिला मेगा फूड पार्क सुरू होणार आहे. बियाडा मुजफ्फरपूर विभागीय कार्यालयांतर्गत मुजफ्फरपुर, गोपालगंज, सीतामढी, पूर्व चंपारण, सिवान, वैशाली या जिल्ह्यांत एकूम १७४४ कोटी रुपयांच्या ४६ गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट आणि इथेनॉल युनिटचा समावेश आहे. रेडी टू इट स्नॅक्स, नमकीन, स्वीटसाठी हल्दीराम भुजायावाला यांचा २९४ कोटींचा प्रस्ताव आहे. मायक्रोमॅक्स बायोफ्यूएल इथेनॉलसाटी २३९ कोटींचा प्रस्ताव आहे. मुजफ्फरपूर बायो फ्यूएलसाठी इथेनॉलचा १३० कोटींचा प्रस्ताव आहे. याशिवाय, सीड प्रोसेसिंग, फ्लोअर मील, वूड आदी प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसाठी उद्योजक समोर आले आहेत.

फूड प्रोसेसिंग युनिटचे मालक केशवनंदन यांनी सांगिते की, त्यांनी बियाडाकडे संपर्क केला आहे. जर जमीन मिळाली तर उद्योग सुरू केला जाईल. बियाडाचे कार्यकारी संचालक सरोज कुमार यांनी सांगितले की मोतीपूरमध्ये मेगा फूड पार्कसाठी डीपीआर तयार करण्यात येत आहे. इथेनॉल युनिटसाठी जमिनी देण्यात आल्या आहेत. लवकरच येथे युनिट सुरू होतील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here