बीपीसीएलचा 53 टक्के हिस्सा खरेदीसाठी अरामको उत्सुक

120

नवी दिल्ली :  देशातील सर्वात मोठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएल कंपनीतील 53 टक्के हिस्सा विक्रीची तयारी केंद्र सरकार ने केली आहे. हा हिस्सा विकत घेण्याच्या शर्यतीत रिलायन्स इंडस्ट्रिज होती. त्यानंतर आता सौदी अरेबियातील अरामको या इंधन कंपनीचे नावही पुढे आले आहे. देशातील इंधन व्यवसायात बीपीसीएलचा सर्वाधिक, 23.40 टक्के हिस्सा असून तिच्यासह अन्य दोन सरकारी कंपन्यांची या क्षेत्रात मातब्बरी आहे. कंपनीचे सध्याचे भागभांडवल 1.11 लाख कोटी रुपये आहे.

बीपीसीएलमधील आपली सर्व भागीदारी विकून 65,000 कोटी रुपये उभारण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे कळते.  यामुळेच बीपीसीएल मधील सरकारी हिश्श्याची विक्री करता यावी यासाठी केंद्र सरकारने आवश्यक नियमदुरुस्ती केली आहे. यामुळे या कंपनीतील 53.29 टक्के हिस्सा विकणे सरकारला शक्य होणार आहे. यातून सरकारला 1.05 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. अरामकोला भारतीय बाजारपेठेत अतिशय स्वारस्य असून रिलायन्सच्या प्रस्तावित भागीरादीव्यतिरिक्त बीपीसीएल मधील सरकारी हिस्सा विकत घेण्याचा प्रस्तावही त्यांच्या विचाराधीन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here