सहारनपूरच्या साखर कारखान्यांवर ३९० कोटी रुपयांची थकबाकी

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी उसाचे सुमारे ३९० कोटी रुपये थकवले आहेत. त्यावरील व्याजाची रक्कमही २९ कोटी रुपये आहे.

जिल्ह्याचा ऊस विभाग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. सरकारने वारंवार ऊस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कारखान्यांकडून पैसे दिले जात नसल्याची स्थिती आहे. ऊस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगनोली साखर कारखान्यावर १८८.१२ कोटी रुपये, शेरमऊ साखर कारखान्याकडे ४३.१३ कोटी रुपये आणि गागलहेडी साखर कारखान्याकडे ४२ कोटी रुपये थकीत आहेत. नानौता सहकारी साखर कारखान्याकडे ७२.९५ कोटी रुपये आणि सरसावा सहकारी साखर कारखान्याकडे १३ ऑगस्टअखेर ४४.७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

उत्तर प्रदेशातील एकमेव देवबंद येथील त्रिवेणी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे दिले आहेत. ऊस मंत्री सुरेश राणा यांनी देवबंद साखर कारखान्याच्या प्रशासनाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, राज्य सरकार लवकरात लवकर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळवून देईल. राज्यातील साखर कारखान्यांकडे २० टक्के थकबाकी असल्याचे मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here