८१ कोटींची थकबाकी: शेतकऱ्यांचे साखर कारखान्यासमोर धरणे

नारायणगड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ८१ कोटी रुपये तातडीने मिळावेत या मागणीसाठी भारतीय किसान युनीयनने (रतन मान) साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. २३ नोव्हेंबरपासून कारखान्याने आजपर्यंत शेतकऱ्यांकडून ९६ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. मात्र, चालू गळीत हंगामात कारखाना व्यवस्थापन फक्त १५ कोटी रुपये देऊ शकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. धरणे आंदोलनस्थळी आलेल्या जिल्हा दंडाधिकारी आणि कारखाना व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांन १५ फेब्रुवारीपासून नियमीत ऊस बिले देण्याचे आश्वासन दिले.

भारतीय किसन युनीयनच्या रतन मान गटाच्या नेतृत्वाखाली शेतकरी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले. मंडल प्रमुख बलदेव सिंह शेरपूर म्हणाले, यमुनानगर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २५ जानेवारीपर्यंत ऊस बिले अदा केली आहेत. मात्र, नारायणगड साखर कारखान्याने फक्त एक डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. बलदेव सिंह शेरपूर म्हणाले, कारखान्याची दूरवस्था पाहून बाहेरील शेतकरीही घाबरत आहेत. त्यामुळे इतर ठिकाणचा ऊस येथे गळीतास येण्याची शक्यता कमी झाली आहे. याशिवाय कारखान्याने शेतकऱ्यांना गेल्या हंगामात अॅडव्हान्स चेकही दिले आहेत. ज्यापैकी अद्याप १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपयेही प्रशासनाने थकवले आहेत.

जिल्हा दंडाधिकारी डॉ. वैशाली शर्मा यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यांनी कारखाना १५ फेब्रुवारीपासून नियमित बिले देईल असे सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊ. सर्वात आधी शेतकऱ्यांना पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here