साखर कारखान्यांकडे ९३२ कोटींची थकबाकी

128

मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या चार वर्षात प्रथमच चालू हंगामात चांगली ऊस बिले दिली आहेत. जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ७१.१२ टक्के पैसे दिले आहेत. साखर कारखान्यांनी यंदा ३२२७ कोटी ९७ लाख रुपयांचा ऊस खरेदी केला. यापैकी २२९५ कोटी ८४ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली असून सध्या ९३२ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे.

खतौली साखर कारखान्याने ७५६ कोटी ७ लाख रुपयांचा ऊस खरेदी केला. त्यापैकी ६२९ कोटी ९३ लाख रुपये म्हणजे ८३.२५ टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तितावील साखरान्याने ५३७ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला असून त्यापैकी ४२३ कोटी २५ लाख म्हणजे ७८.८२ टक्के बिले दिली आहेत. भैसाना कारखान्याने फक्त १२.११ टक्के पैसे दिले आहेत. एकूण थकबाकीत निम्मा वाटा या एका कारखान्याचा आहे. मन्सूरपूर साखर कारखान्याने ४५२ कोटी ८ लाख रुपयांचा ऊस खरेदी केला होता. त्यापैकी ३८१ कोटी ८ लाख म्हणजे ५४.१५ टक्के ऊस बिले दिली आहेत. टिकौला कारखान्याने ५५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ऊस खरेदी केला असून ४६४ कोटी ५४ लाख म्हणजे ८४.२५ टक्के पैसे देण्यात आले आहेत.
खाईखेडी कारखान्यात २०७ कोटी ४९ लाख रुपयांचा ऊस खरेदी केला. त्यापैकी १६६ कोटी ११ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एकूण ८०.०६ टक्के मिळाले आहेत. रोहाना कारखान्याने १०७ कोटी ४९ लाख रुपयांच्या उसाचे गाळप झाले. त्यापैकी ८७ कोटी ८१ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. मोरना कारखान्याने १६७ कोटी ८६ लाख रुपयांचा ऊस खरेदी केला. त्यापैकी ८८ कोटी ९८ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. कारखान्याने ५३.०१ टक्के बिले अदा केली आहेत.

भैसाना या एकमेव कारखान्याने १२.११ टक्के पैसे दिले आहेत. एकूण ४४७ कोटी २४ लाख रुपयांपैकी ५४ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, ऊस बिले देण्यात जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here