किसान सन्मान योजनेचे मानधन वाढवण्याचे जेटलींचे संकेत

786

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

 नवी दिल्ली : चीनी मंडी

पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला देण्यात येणार असलेल्या सहा हजार रुपये मानधनात वाढ करण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारांना त्यांच्या महसूलातून त्यात वाढ करण्याची मुभा असल्याचेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. त्यात शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये वार्षिक मानधन देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महिन्याला ५०० रुपये मानधन शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यावर विरोधकांनी टिका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. त्याचा जेटली यांनी समाचार घेतला.

आगामी निवडणुका या कोणत्या कॉलेजच्या निवडणुका नाहीत तर देशातील सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थोडे मोठे होण्याची गरज असल्याचा जेटली यांनी लगावला.

जेटली म्हणाले, ‘यूपीए सरकारच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातो. पण, त्यातील केवळ ५३ हजार कोटींचेच वाटप करण्यात आले होते. कॅगने दिलेल्या अहवालात त्यापॅकेजमधील बरेचसे पैसे गैरव्यवहारामुळे व्यापारी, उद्योजक यांच्या घशात गेले.’

सध्याच्या सरकारने लाख कोटी रुपयांनाही मागे टाकले आहे. आम्ही ग्रामीण भागात मोठी गुंतवणूक करत आहोत. वर्षाला ७५ हजार कोटी रुपये प्रमाणे आम्ही सुरुवात केली. आता येत्या वर्षांत ती रक्कम वाढेल. यात आता काही राज्य सरकारांनी पुढाकार घेतला आहे. इतरांनीही त्यांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे जेटली यांनी सांगितले.

मुळात शेतकऱ्यांचे हित ही राज्य सरकारांचीही तेवढीच जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या मिळकतीतून शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या योजना आणाव्यात. काही सरकार ते कत आहेत, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाचे सरकार असलेल्या राज्य सरकारांना ते करण्यास सांगावे, असा सल्ला जेटली यांनी राहुल यांचे नवा न घेता दिला. जीएसटी प्रमाणे याविषयातही सर्व पक्षांनी राजकीय सीमा सोडून सरकारला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली. या योजनेनेंतरही जवळपास १५ कोटी भूमीहिन शेतकरी कोणत्याही लाभापासून वंचित आहेत, यासंदर्भात विचारले असता, त्या शेतकऱ्यांसाठी मनरेगासारख्या योजना असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here