अशोक कारखान्याने थकित बिले द्यावीत : सभासदांचे कार्यकारी संचालकांना निवेदन

अहिल्यानगर : अशोक कारखाना व्यवस्थापनाने चालु गळीत हंगामातील डिसेंबर २३ पर्यंतची बिले दिली आहेत. उर्वरित पाच पंधरवाड्यांची ऊस बिले थकल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. याबाबत माजी सभापती डॉ वंदना मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी कार्यकारी संचालक सुरेश देवकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. जानेवारीपासूनची ऊस बिल थकीत आहेत, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

कारखान्याने कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे पगार, सेवानिवृत्त कामगारांची देणी थकवली आहेत. ऊस तोडणी उशीरा होत असल्याने एकरी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पैसे न मिळाल्याने पैशांअभावी विवाह सोहळे, खते, देणी, शेती मशागती खोळंबल्या आहेत. तातडीने पैसे मिळावेत अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात शांताराम तुवर, विराज भोसले, खंडेराव पटारे, राजेंद्र कोकणे, रमेश उंडे, शांताबाई जाधव, बंडोपंत बोडखे, लक्ष्मण जाधव, सुदामराव पठारे, भरत जाधव, भरत साळुंखे, अनिल उंडे, दगडु उंडे, शाहुराज वमने, गणपत औताडे, बापूसाहेब लबडे, सुदाम पठारे, अजिंक्य उंडे, शंकरराव लबडे, अर्जुन खेमनर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here