आगामी गळीत हंगामात साखर कारखान्याचे व्यवस्थापन सुरळीत करण्याची सूचना

बुलंदशहर : उत्तर प्रदेशात आगामी गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. देखभाल-दुरुस्तीची कामेही गतीने सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी आढावा घेण्यात आला आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अनुपशहरचे आमदार संजय शर्मा यांनी शुक्रवारी जहांगीराबाद येथील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. शासनाने निश्चित करून दिलेल्या कालावधीत कारखाना सुरू होईल, याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. कारखान्याच्या व्यवस्थापनाने सांगितले की, गळीत हंगामाच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. णि कारखाना हंगामात सुरळीत चालेल याची दक्षता घेतली जात आहे. आमदारांनी ऊस उत्पादकांच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here