आसाम पोलिसांकडून तस्करीवर कारवाई, साखर जप्त

आसाममधील मानकाचार जिल्ह्यातील दक्षिण सलमारा पोलिस ठाण्यातील पोलिस पथकाने छापा टाकून तस्करी करून मोठ्या प्रमाणात नेण्यात येणारा साखरेचा साठा जप्त केला. ब्रह्मपुत्रा नदीकाठी रश्मारी परिसरातून पोलिसांच्या पथकाने एक बोट जप्त करून तीन तस्करांना अटक केली.

The Sentinel मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, दक्षिण सलमारा पोलिस स्टेशनचे प्रभारी टिळक चंद्र राय यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने नदीकाठी कसून झडती घेतली. यावेळी प्रत्येकी ५० किलोची साखरेची ८० पोती सापडली. यावेळी तीन तस्करांसह एक यांत्रिक बोट जप्त करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार, ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून बांगलादेशात अनेक बोटींमधून साखरेची तस्करी केली जात आहे. दक्षिण सलमारा पोलिसांनी छाप्यादरम्यान एक बोट पकडण्यात यश मिळवले. इतर बोटी अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी झाले.सीमा ओलांडून माल वाहतुकीसाठी तस्कर विविध मार्गांचा वापर करतात. ते अनेकदा नदीमधून ये-जा करण्यासाठी लहान बोटी किंवा तराफा वापरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here