ऊस शेतकरी ओम पाल सिंह यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईचे आश्वासन

मुजफ्फरनगर: उत्तर प्रदेशा मध्ये ऊस शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाबाबत एक नवी गोष्ट समोर आली आहे. 55 वर्षीय शेतकरी ओम पाल सिंह यांच्या आत्महत्येच्या एक दिवसानंतर मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या सिसौली शहरामध्ये कथित ऊस थकबाकी बाबत विरोध सुरु झाला होता. ऊस विभागातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, 156 क्विंटल ऊस पुरवठ्यासाठी एकूण 47,194 रुपयांपैकी 31,334 इतके पैसे भागवले होते.

मुजफ्फरनगर चे जिल्हा मजिस्ट्रेट (डीएम) सेल्वा कुमारी जे म्हणाले, ओम पाल सिंह यांना हंगामासाठी आपल्या कोट्यानुसार खतौली-त्रिवेणी साखर कारखान्यामध्ये 156 क्विंटल ऊसाचा पुरवठा करायचा होता, पण त्यांनी 149 क्विंटल चा पुरवठा केला .

ओम पाल सिंह यांच्या आत्महत्येमुळे उत्तर प्रदेश च्या राजकारणात भूकंप झाला आहे. सत्ताधारी भाजपा ला समाजवादी, कांग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्रीय मंत्री आणि स्थाानिक सांंसद संजीव बालयान यांनी सिसौली चा दौरा केला आणि ओम पाल यांच्या परिवाराला 10 लाख रुपये भरपाई देण्याच्या घोषणेनंतर शुक्रवारी 22 तासाचे विरोध प्रदर्शन बंद केले. मुजफ्फरनगर प्रशासन आणि पोलीसांनीही है मान्य केले की, ओम पाल ने आपल्या भावंडांं बरोबरच्या जमिनीच्या वादातून हे पाऊल उचलले आहे.

बालयान यांनी शुक्रवारी संध्याकाळी ओम पाल यांच्या परिवाराला एक आठवड्याच्या आत सीएम दिलासा पॅकेजच्या माध्यमातून 5 लाख रुपये आणि अपल्या इतर प्रयत्नांंच्या माध्यमातून 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here