अफगाणिस्तानात शक्तीशाली भुकंपाने अनेक ठिकाणे उद्ध्वस्त

29

अफगाणिस्तानात आलेल्या शक्तीशाली भुकंपाने किमान २८० लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियावर दिसत असलेल्या जखमींच्या संख्येवरुन नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. सर्वाधिक नुकसान पक्तिका प्रांतात झाले आहे. या प्रांतात सर्वाधिक घरे कोसळली आहेत. येथील छायाचित्रांमध्ये जखमींना स्ट्रेचरवरून घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

याबाबत बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या मृतांची संख्या २८० आहे. मात्र ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. दूरच्या लोकांना हेलिकॉप्टरद्वारे हॉस्पिटल्समध्ये दाखल केले जात आहे. स्थानिक बख्तर न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार किमान सहाशे लोक जखमी आहेत. मृतांची संख्या आणखी वाढू शकते. मिळालेल्या माहितीवरून भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण पूर्व शहर खोस्तपासून ४४ किलोमीटरवर आहे. भूकंपाचे धक्के अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातही जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानची राजधानी काबूल, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही धक्के जाणवले. तालिबानचा प्रवक्ता बिलाल करीमी यांनी ट्वीट करून भुकंपात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री दीड वाजता हा भुकंप झाला आहे. पक्तिका प्रांताशिवाय भूकंपाचा परिणाम ख़ोस्त, गज़नी, लोगार, काबुल, जलालाबाद आणि लग़मनमध्ये झाला आहे. अमेरिकन जीऑलॉजीकल सर्व्हेच्या म्हणण्यानुसार भुकंपाची तिव्रता ७.१ रिस्ट्रर स्केल होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here