अथणी-रयत शुगर्स करणार ७ लाख मेट्रिक टन गाळप : सीएमडी श्रीनिवास पाटील

सातारा:अथणी-रयत शुगर्स लि. शेवाळेवाडी-म्हासोली कारखाना येत्या गाळप हंगामात ७ लाख मे.टन गाळप करणार आहे.कारखान्यात बुधवारी मिल रोलर पूजन कार्यक्रम अथणी शुगर्सचे सीएमडी श्रीनिवास पाटील आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते झाले. २०२४-२५ हंगामात उद्दीष्टपूर्तीसाठी तोडणी वाहतूकदारांशी करार करून ॲडव्हान्स दिला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वास चेअरमन पाटील यांनी व्यक्त केला.

चेअरमन पाटील म्हणाले की, अलीकडेच रयत युनिटचे विस्तारीकरण केले आहे.कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन ५००० मे.टनपर्यंत वाढवली आहे.१४.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी करून कार्यान्वित केलेला आहे.गेल्या हंगामात, २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना प्रती टन ३१५० रुपयांप्रमाणे बिले देण्यात आली आहेत.कार्यक्रमास अथणी शुगर्स लि.चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर आणि सीएफओ योगेश पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुशांत पाटील, युनिट हेड रविंद्र देशमुख, रयत सहकारी साखर सर्व संचालक, खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here