हवाना : क्युबामध्ये चालू हंगामात पिकापासून अधिक साखर उत्पादनाचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील ११ विभागांमध्ये सध्या २४ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. याशिवाय, ३५ साखर कारखाने गाळपात सहभागी होतील अशी शक्यता आहे.
प्रसार माध्यमातील वृ्त्तानुसार, ३० कारखान्यांमध्ये ९,११,००० टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या हंगामात गाळपाची सुरुवात १४ डी ज्युलियो साखर कारखान्यापासून झाली. हवानापासून जवळपास ३५० किलोमीटर दक्षिण-पू्र्वमध्ये हा कारखाना आहे. हा देशातील अत्याधुनिक कारखाना आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सिरो रेडोंडो कारखान्याने मध्य क्युबामधील सीगो डी एविलामध्ये कामकाज सुरू केले. कारखान्याच्यावतीने वीज उत्पादनही केले जात आहे.
कारखानदारांनी वेळेवर कारखाने सुरू करण्याची हमी देण्यास महत्त्व दिले आहे. त्यामुळे गाळपातील अडचणी दूर होऊ शकतील.