सोलापूर जिल्ह्यात निर्मिती केलेले सॅनिटायजर इतर राज्यात पाठवण्याचे प्रयत्न

130

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ब्रिमासागर डिस्टिलरी श्रीपूर, पांडूरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, जकराया शुगर वटवटे, विष्णू लक्ष्मी डिस्टीलरी अक्कलकोट रोड सोलापूर, लोकमंगल शुगर बीबीदारफळ, फॅबटेक शुगर नंदूर याठिकाणी सॅनिटायजर निर्मितीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हात धुणे हा उपाय सध्या महत्वाचा मानला गेला आहे. हात धुण्यासाठी सॅनिटायजरची मागणी वाढली असल्याने देशात तुटवडा जाणवत आहे. म्हणून सोलापूरातील साखर कारखान्यांनी सॅनिटायजर बनवायला सुरुवात केली आणि आता जिल्ह्यातील सॅनिटायजर इतर राज्यात पाठवण्यासाठी प्रशासानच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत.

सोलापूरातील सात डिस्टिलरींशिवाय युटोपियन शुगर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि टेंभुर्णी येथील खंडोबा डिस्टिलरी सॅनिटायजर निर्मितीची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. यांनाही परवानगी मिळेत, अशी माहिती औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त भीषण पाटील यांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here