अवध साखर कारखान्याने केले विक्रमी साखर उत्पादन

230

बिजनौर : अवध साखर कारखान्याचा गाळप हंगाम सोमवारी रात्री 10.30 वाजता शेवटच्या ट्रॉलीतील ऊस घालून संपला. वर्ष 2019-2020 च्या गाळप हंगामामध्ये 216 दिवस चालू असणार्‍या कारखान्याने आपले सर्व जुने रेकॉर्ड तोडून 2 करोड 15 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले.

याच अवधीमध्ये साखर कारखान्याकडून 24 लाख 70 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. या वेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुखबीर सिंह यांनी सांगितले की, क्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप करुन कारखाना बंद करण्यात आला आहे. त्यांनी यशस्वीपणे चाललेल्या गाळप हंगामासाठी शेतकरी, साखर कारखाना अधिकारी तसेच श्रमिकांचे आभार व्यक्त केले. मनोज गोयल, चीफ इंजिनिअर धमेंद्र सिंह, चीफ इंजीनियर दिवाकर सिंह, केन मॅनेजर बलवंत सिंह, ऊस व्यवस्थापक यादव तसेच इंजिनियर आर.एस. पोतदार आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here